भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे विभागात रेल्वे प्रवाशी सल्लागार समिती सदस्यांच्या बैठक दुपारी 3 वाजेच्या सुमारास घेण्यात आली. यावेळी या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे प्रबधंक विवेक कुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे प्रबधंक मनोज सिन्हा, वरिष्ट विभागीय वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा, विभागीय वाणिज्य प्रबधंक बी.अरुण कुमार, वरिष्ट विभागीय अभियंता राजेश चिखले, वरिष्ट विभागीय परिचालन प्रबधंक स्वप्निल नीला, वरिष्ट विभागीय सिग्नल –दूरसंचार अभियंता निशांत द्रिवेदी, वरिष्ठ विभागीय विदयुत अभियंता जी.के.लख्रेरा, सहायक वाणिज्य प्रबधंक अजय कुमार, सहायक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यावेळी रेल्वे उपयोगकर्ता सलाहकार समिति मींटिंगला विजय बाफना (मलकापुर), नितिन बंग (धुळे), ज्ञानप्रकाश खंडेलवाल (अकोला), ललित बरडीया (जलगाँव), मनोज सोनी (खंडवा), राजेश झंवर (भुसावळ), महेंद्रकुमार बुरड (मलकपुर), धर्मा पाटिल (पाचोरा), वसंतकुमार बाछुका (अकोला), अनिकेत पाटिल (भुसावळ), दीपक मायी (अकोला), विजय पनपलिया (अकोला), मोहन शर्मा (मलकापुर), महेश पाटिल (अमळनेर), राजेश सुराणा (भुसावळ), राजनारायण मिश्रा (अकोला), दिलीप पाटिल (पाचोरा), पराग बढे (चालीसगांव), प्रवीण महाजन (दोडाईचा), सतीशचंद्र शर्मा (मुर्तिजापुर), रमेश काकलिज (नंदगाँव), अरुण पोबारू (यवतमाल), पंढरीनाथ मदने (धुळे ), जनराव कोकरे (अमरावती), नवनीत वजीरे (नासिक), मधुकर फासे (मलकापुर) इत्यादी सदस्य उपस्थित होते.
या समितिचे उद्देश आहे की, रेल्वे प्रवाशी आणि रेल्वेप्रशासन सोबत सरळ संपर्क होऊ शकतो आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध करू शकतो. यावेळी भुसावळ विभागामध्ये सुरु असलेल्या कार्याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे प्रबधंक यांनी डीआरयुसीसी सदस्याना विनंती केली की एनजीओ/सीएसआरच्या माध्यमातून वाढवा मिळणासाठी आणि स्टेशनवर प्रवाशांना सुविधामध्ये मोठ्या विस्ताराला आपले योगदान करावे, भुसावळ विभागामध्ये काही स्टेशनवर पादचारी पुल, लिफ्ट आणि एस्केलेटर्सचे कार्य प्रगतिवर आहे . भुसावळ, शेगांव, आणि जळगाव या स्टेशनवर सौदर्यीकरणाचे कार्य प्रगतीपथावर आहे. डीआरयुसीसी सदस्यानी आपले सुझाव आणि मार्गदर्शन भुसावळ विभागामध्ये सुरु असलेल्या कार्याबद्दल माहिती जाणून घेतली. सूत्रसंचालन वरिष्ट विभागीय वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा आणि आभार विभागीय वाणिज्य प्रबधंक बी.अरुण कुमार यानी केले.