नवी दिल्ली, वृत्तसंस्था | केंद्रातील मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी भेट दिली आहे. यावर्षी या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस मिळणार आहे. केंद्र सरकार बोनसवर २०२४ कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज (दि.१८) दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महत्वाचे निर्णय घेतले. त्यात यावर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. रेल्वेच्या ११.५२ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना सलग सहाव्या वर्षी बोनस जाहीर झाला आहे. हे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे बक्षीस आहे, असेही जावडेकर यावेळी म्हणाले.