धावत्या रेल्वेतून पडल्याने तरूणांचा मृत्यू

Crime

रावेर प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून पडून मध्यप्रदेशातील एका तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पुनखेडा रेल्वे पुलाजवळ घडली. याबाबत रावेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव खेलनसिंग गंगारामसिंग राठोड (वय- २५) आहे. रावेर वाघोड दरम्यान पुनखेडा रेल्वे पुलानजिक खंबा क्रमांक ४२२/२४ जवळ डाऊन रेल्वे लाईनवर त्यांचा मृतदेह आज सकाळी ९:३० वाजता आढळून आला. कोणत्यातरी धावत्या रेल्वेगाडीतून पडल्याने डोक्याला जबर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला.त्याच्या जवळ असलेल्या मोबाईल सहाय्याने पोलिसांनी त्याचे नाव गावाची माहिती मिळविली. तो पठारिया जिल्हा उमरिया (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे. याबाबत अशोक धोंडू महाजन यांनी खबर दिल्याने रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंदकरण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.का.अर्जुन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

Add Comment

Protected Content