भुसावळ, प्रतिनिधी | येथील रेल्वे विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त रेल्वे स्थानकावर परेड करून सरदार वल्लभभाई पटेल यांना सलामी देण्यात आली. यावेळी डीआरएम कार्यालयातील सर्व रेल्वेचे पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने रेल्वेस्थानक व परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी बोलताना डीआरएम म्हणाले की, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारताच्या स्वातंत्र्य मिळविण्यात मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेची व अखंड भारताची त्यांच्या जयंतीनिमित्त आठवण करून दिली जात आहे. देशाच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर सरदार पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.