चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव ते पिंपरखेडच्या दरम्यान आज सकाळी सुविधा एक्सप्रेसचे डबे घसरून अपघात झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, आज सकाळी बरोली येथून लोकमान्य टिळक टर्मिनस कडे जाणारी हॉलिडे स्पेशल सुविधा एक्स्प्रेस क्रमांक ०२०६२ हिचे इंजिनचे चाक पिंपरखेड ते नांदगावच्या दरम्यान तुटल्याने मोठा अपघात झाला असून यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक जवळपास पुढील तीन तास ठप्प होणार असल्याचे वृत्त आहे. सकाळी साधारण ८ ते ८-३० वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असून ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. शक्यतो रेल्वेचे चाक कधीच तुटत नाही, परंतु आज झालेला हा अपघात अनेक वर्षानंतर झालेला पहिला अपघात आहे. वेळीच इंजिनच्या ड्रायव्हरच्या लक्षात ही गोष्ट आली नसती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. आज रविवार असल्यामुळे सुट्टी साजरी करणार्या पर्यटक प्रवाशांची या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असून यापैकी कुणालाही काहीही दुखापत बाधा झाली नाही. दरम्यान चाळीसगाव रेल्वे स्टेशन पासून मागे मुंबईकडे जाणार्या सर्व रेल्वे गाड्या उभी असल्याचेही समजले आहे.

railwa accident chalisgaon 1