यावल पंचायत समितीच्या आवारात शोष खड्डा

yaval panchyat samiti project

यावल( प्रातिनिधी) येथील पंचायत समितीच्या आवारात श्रमदानातुन शोषखड्डा तयार करण्यात येत असुन या शासकीय अभियानास नागरीकांचाही मोठा सहभाग मिळत असल्याचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सांगीतले.

तिव्र टंचाईच्या पार्श्‍वभुमीवर संभाव्य पाण्याची टंचाई टाळण्यासाठी गावागावात पावसाच्या वाहुन जाणार्‍या पाण्यास या शोष खड्डयांच्या माध्यमातुन आपण पाणी संकलीत करून जिरवू शकतो. तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्राम पंचायत आणी नागरीकांनी आपले सामाजीक कर्तव्य समजुन मिळेल त्या ठीकाणी शोषखड्डे तयार करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावल पंचायत समितीच्या आवारात पावसातील वाहून जाणार्‍या पाण्यास जिरवण्यासाठी कुपनलीकेचे पुर्नभरण करण्यासाठी सहा बाय सहाचा आणी सहा फुट खोलीचा शोषखड्डा श्रमदानातुन तयार करण्यात येत आहे.

पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांच्यासह वरीष्ठ कक्ष अधिकारी बबन तडवी, जितेन्द्र मोरे, कृषी खात्याचे राहुल महाजन, यांच्यासह सर्व कर्मचारी व सामाजीक कार्यकर्ते यांनी या शोषखड्डयाच्या निर्मितीसाठी योगदान दिले आहे. पंचायत समितीच्या सभापती सौ. पल्लवी चौधरी पंचायत समितीचे विरोधी गटनेते शेखर सोपान पाटील,संगांयोचे अध्यक्ष विलास चौधरी तालुकाभाजपचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत यांनी या शोषखड्डयाच्या कार्याची पाहणी करून तालुक्यातील नागरीकांनी देखील याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

Add Comment

Protected Content