जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोपाळपूरा आणि शनीपेठेतील जिल्हा परिषद शाळेजवळ सुरू असलेल्या दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर आज दुपारी १ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि शनीपेठ पोलीसांनी छापा टाकून ३ हजार ९९० रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी तीन जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील गोपाळपूरा येथे जुगार अड्ड्यावर दुपारी १२.४५ वाजता शनीपेठ पोलीसांनी छापा टाकून संशयित आरोपी नितीन बापु निकम (वय-२२) आणि विक्की माणिक बाविस्कर (वय-२५) दोन्ही रा. रा. आंबेडकर नगर, गोपाळपूरा यांच्या ताब्यातील १ हजार २०० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. तर दुसऱ्या कारवाईत दुपारी १ वाजता शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला मिलन डे नावाचा सट्टा खेळत असल्याचे दिसून आले. यावर देखील पोलीसांनी छापा टाकून संशयित आरोपी दिपक निळकंठ चौधरी (वय-४५) रा. धानोरा ता. चोपडा जि.जळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ हजार ७९० रूपयांची रोकड आणि आकडे लिहिलेले आकड्यांची वही आणि काही पावत्या हस्तगत केले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रीकृष्ण पटवर्धन, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, सुनिल दामोदरे, पंकज शिंदे यांनी ही कारवाई केली.