मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : मुक्ताईनगर पोलिसांनी अवैद्य दारू विक्री विरुद्ध धडक मोहीम राबवत एका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १८ हजार ४०० रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.
शहरातील अंतुर्ली फाटा परिसरात एका इसमाने विनापरवाना दारूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. आरोपी विरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, अवैद्य धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.




