जुगार अड्डयावर धाड : नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल

 

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील बस स्थानकाच्या मागील बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, सावदा शहरातील बस स्थानक परिसरात मागील बाजूला असलेल्या पत्री शेडमध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने सावदा पोलिसांच्या पथकाने आज येथे छापा टाकला.

या छाप्यामध्ये संजय लक्ष्मण चौधरी ( वय ५०, रा. स्वामीनारायण नगर, सावदा ); रोहित चंद्रकांत सन्यास ( वय २३, रा. आंबेडकर नगर, सावदा ); अस्लम रशीद तडवी ( वय ४२, रा. काझीपुरा, सावदा ); सुनील धनराज चौधरी ( वय ४३, रा. भोईवाडा, सावदा ); अशोक प्रल्हाद खुर्दे ( रा. विवरा, ता. रावेर ); संदीप कोळी ( पूर्ण नाव माहित नाही. रा. कोचूर); विशाल कोळी ( पूर्ण नाव माहित नाही. रा. सावदा); बबलू कासार ( पूर्ण नाव माहित नाही. रा. सावदा ) आणि इम्रान शेख उर्फ इम्मो (रा. बडा आखाडा, सावदा ) यांच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक २५ रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली.

दरम्यान, या कारवाईत, ११२५० रूपये रोख, चार मोटारसायकली आणि चार मोबाईल असा एकूण अंदाजे २ लाख १२ हजार ७०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Protected Content