विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहूल नार्वेकर यांची बिनविरोध निवड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधासभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते आ. राहूल नार्वेकर यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.

महायुतीने अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश संपादन केले असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली असून लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार देखील होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर आज विधानसभा सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली.

विधानसभेचे हंगामी सभापती कालीदास कोळंबकर यांनी सभापती म्हणून राहूल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला असता तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यामुळे लागोपाठ दुसऱ्यांदा विधानसभा सभापतीची जबाबदारी स्वीकारणारे ते पहिले नेते ठरले आहेत.

Protected Content