मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आपण असहमत असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.
कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी सावकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमिवर, राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात स्पष्ट भूमिका मांडली आहे.
आज उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. ’राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. सावरकरांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यवीरांप्रमाणे आधी वागायला शिका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
तसेच उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवही निशाणा साधला. एवढी वर्ष सत्तेत आहेत मग सावरकरांना भाजपने भारतरत्न का दिलं नाही. आठ वर्ष ते सत्तेत आहेत. केंद्र सरकारला काही अधिकार असतात. भारतरत्न देण्याचा अधिकार पूर्ण पंतप्रधानांचा आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.