नवी दिल्ली वृत्तसंस्था । गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेल्या वाढीवरून काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी मोदी सरकारने आता अन्नदात्यासह अन्नपूर्णेवरही वार केल्याची घणाघाती टीका केली आहे.
ऑईल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोचे सिलिंडर ५० रुपयांनी, ५ किलोचे शॉर्ट-सिलिंडर १८ रुपयांनी आणि १९ किलोचे सिलिंडर ३६.५० रुपयांनी महागले आहे. मागील १५ दिवसांत सिलिंडरच्या दरात दोन वेळा १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीवरून काँग्रेचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं असून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार. देशाला आणखी किती लाचार करणार आहात? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.