राहुल गांधींकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन तर मोदींना दिल्या जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा

दिल्ली (वृत्तसंस्था) भारताच्या ‘मिशन शक्ती’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचे यश जगापुढे मांडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत मिश्किल टोला हाणला आहे. भारताच्या डीआरडीओने उत्तम कामगिरी केली असून, मला त्यांचा अभिमान आहे, असे म्हणत, याबरोबरच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतो असे ट्विट करत पंतप्रधान मोदी हे उत्तम अभिनेते असल्याचे सूचित केले आहे.

 

पंतप्रधान मोदी यांनी सकाळी ट्विट करून आपण मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी देशाला संबोधित करताना डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीची माहिती दिली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्याचवेळी त्यांनी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त पंतप्रधान मोदींना आवर्जुन शुभेच्छा दिल्या.

Add Comment

Protected Content