‘मैं भी चौकीदार’ मोहिम सापडली अडचणीत ; निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिम अडचणीत सापडली आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला नोटीस पाठविली असून व्हिडिओ परवानगी न घेताच सोशल मिडीयावर पोस्ट प्रचाराचा केल्याचा जाब विचारण्यात आला आहे.

 

आयोगाने सांगितले की, 16 मार्चला या प्रकरणी मिडिया सर्टीफिकेशन अँड मॉनिटरिंग समितीने भाजपाला नोटीस पाठविली आहे. ‘मैं भी चौकीदार’च्या प्रचाराच्या व्हिडिओमध्ये भाजपाने जवानांचेही चित्रिकरण दाखविले आहे. निवडणूक आयोगाने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सर्व पक्षांना लष्कराच्या कारवाईचा आणि त्यांच्या फोटोंचा वापर न करण्याची सक्त ताकीद दिली होती. मात्र, यानंतरही भाजपाने या व्हिडिओमध्ये जवानांचा वापर केला आहे. यावर आयोगाने जोरदार आक्षेप घेतला असून पंतप्रधान भाजपाचे निवडणूक समिचीचे सदस्य नीरज कुमार यांनी शेअर केला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नीरज यांना उत्तरासाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे.

Add Comment

Protected Content