योगा करत नाहीत म्हणून राहुल आणि काँग्रेसचा पराभव : रामदेवबाबा

yoga

 

मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व योग करत नसल्यानेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पाहावा लागला, असा दावा रामदेव यांनी केला आहे. विधिमंडळ वार्ताहर संघात प्रात्यक्षिकासह योगाच्या खास टिप्स दिल्यानंतर रामदेव बाबा पत्रकारांशी संवाद साधत होते.

 

 

जागतिक योग दिन २१ जून रोजी साजरा करण्यात येणार असून या दिनाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रामदेव यांनी आज विधिमंडळ वार्ताहर संघात योगाचे काही प्रात्यक्षिक दाखवली. त्यानंतर रामदेव यांनी विधिमंडळ वार्ताहर संघात शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. योगाचे महत्त्व सांगण्यासाठी रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा दाखला दिला. योग केल्यास ‘अच्छे दिन’ नक्कीच येतात. पंतप्रधान मोदी सार्वजनिकपणे योग करतात. माजी पंतप्रधान नेहरू व इंदिराजीही कुणाच्या नकळत योग करायचे. मात्र काँग्रेसची नंतरची पिढी योगापासून दूर गेली आणि तिथेच त्यांची राजकारणातील गणितं बिघडली, असा टोला रामदेव यांनी यावेळी लगावला. दरम्यान, यावर कॉंग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

Protected Content