पालघरमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग ; 15 डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

images 1

 

पालघर (वृत्तसंस्था) प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रॅगिंगप्रकरणी पालघर पोलिसांत एम.एल.ढवळे रुग्णालयातील 15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

पिडीत महिला डॉक्टर ढवळे रुग्णालयात आपले शिक्षण पूर्ण करुन प्रशिक्षणार्थी म्हणून दोन-तीन दिवसांपूर्वी रुजू झाली होती. इथे प्रशिक्षण घेत असताना वरिष्ठांसोबत ओळख करुन घेत असताना, त्यांनी गुरुवारी (14 नोव्हेंबर) रात्री छळ केला. याविरुद्ध पिडीत महिला डॉक्टरने संबंधितांनी आपल्याला मानसिक इजा पोहोचल्याचा आरोप केला आहे. पिडीत महिला डॉक्टरने शुक्रवारी पालघर पोलिस स्टेशन गाठून सर्व वरिष्ठ डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली.

Protected Content