पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शाळेतून मिळालेले संस्कार म्हणजे आयुष्याची शिदोरीच, संस्कारांच्या या शिदोरीवरच आपले आयुष्य आपण यशस्वीरित्या जगू शकतो. आपण विद्यार्थी दशेपासूनच नीती -मूल्यांची कास धरली पाहिजे, आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले पाहिजे , असे भावनिक आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते संतोष पाटील ( आंबेवडगाव ) यांनी केले. पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे आद्य संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय किसनराव ठमाजी पाटील यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘शाळा -विद्यार्थी आणि संस्कार’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
प्रारंभी स्वर्गीय किसनराव पाटील आणि दादासाहेब कॅप्टन डॉ. एम .आर . लेले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले . पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष साहेबराव पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस .आर . सोनवणे यांनी केले . याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.व्ही .पाटील , रामेश्वर पाटील यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिवंगत बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे स्मृती प्रित्यर्थ शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या तर्फे मान्यवरांच्या हस्ते ५ गरीब – होतकरू विद्यार्थिनींना शालेय गणवेश वितरीत करण्यात आले . तसेच शाळेचे शिक्षक आर डी . सुरडकर यांनी गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या.
या प्रसंगी सरपंच आशाताई जाधव ,उपसरपंच शरद पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख , संचालक ॲड . एस . आर .पाटील , शेंदुर्णी जिनिंगचे माजी चेअरमन श्यामराव सावळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस .एस .गावंडे, व्ही . जी .भालेराव, आर . बी . पाटील , सेवानिवृत्त शिक्षक ए .पी .पाटील ,आर. एम . कलाल , पर्यवेक्षक एम .बी . पवार ,संस्था प्रतिनिधी तथा वरिष्ठ लिपिक किशोर पाटील, कनिष्ठ लिपिक शरद पाटील , ग्रामपंचायत सदस्य बंडू पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शंकर भामेरे यांना सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. टी. देशमुख यांनी केले. मुख्याध्यापक एस .आर .सोनवणे यांनी आभार मानले . यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.