मुंबई । सोनिया गांधी यांनी भाजपेतर मुख्यमंत्र्यांच्या बोलावलेल्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेल्या उत्तरात लढनेवाले बापका लढनेवाला बेटा असू ठणकावून सांगितले. त्यांचा हा बाणा आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज भाजप सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक झाली. जीसटी तसंच करोना संकटामुळे राज्यांना झालेलं आर्थिक नुकसान याशिवाय जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी वारंवार होत असलेल्या मागणीवर सोनिया गांधी बैठकीत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मंत्रीमंडळाची बैठक होती. त्यामुळे सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना उद्धव यांना बोलू देण्यास सांगितले. उद्धव ठाकरे त्यावर ममता दीदींना म्हणाले इजाजत है क्या दीदी..
ममता : उद्धव जी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है..
उद्धव ठाकरे : लढने वाले बाप का लढने वाला बेटा हूं..
उध्दव ठाकरे यांनी दिलेले हे उत्तर आता सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.