रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदेश यात्रेचे रावेर शहरात आगमन झाल्यानंतर त्याचे स्वागत करण्यात आले. शहरातील अग्रसेन मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची गौरव करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, भाजप जिल्हा महिला अध्यक्षा रंजना पाटील, धनगर समाज संघर्ष समिती प्रदेशाध्यक्ष सुभाष सोनवणे, बाजार समिती संचालक जयेश कुयटे, मंदार पाटील, लखन साबळे, डॉ. ताराचंद साबळे, संदीप सावळे, पदमाकर महाजन, सोपान पाटील, गोंडू महाजन, आणि राजन लासूरकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे स्मरण करून त्यांचे योगदान नव्या पिढीला प्रेरणा देण्यासारखे असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. समाजातील विविध पदाधिकारी आणि बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.