चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोढरे गावात गेल्या काही दिवसांपासून विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र कारवाई दरम्यान सरपंच व कृषी सहायक हे विना मास्क आढळून आल्याने त्यांच्यासह अन्य १८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात कोरोना बांधीत रूग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यात ग्रामीण भागात मृत्यूच्या दरात लक्षणीय वाढ झालेली आहे. या पाश्र्वभूमीवर कोरोनाला एसीवरच थोपविण्यासाठी तालुक्यातील बोढरे गावात विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू आहेत. मात्र शनिवार, २२ रोजी पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी चक्क सरपंच गुलाब राठोड व कृषी सहायक तुफान खोत हे विना मास्क आढळून आले. त्यामुळे त्यांच्यासह अन्य १८ जणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण २ हजार रुपये वसूली करण्यात आले. हि कारवाई पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईमुळे ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ झाली आहे. दरम्यान कोरोनापासून ग्रामस्थांचे संरक्षण व्हावे यासाठी गावात मास्क व सॅनेटाईझचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मास्क व सॅनेटाईझचे वाटप करण्यात आले. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडावर मास्क लावल्याशिवाय घरा बाहेर फिरू नये असे जनजागृती ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. परंतु गावाच्या प्रमुखांकडूनच सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असेल तर सर्वसामान्य ग्रामस्थांनी नियमांचे पालन करावे का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहे. त्यामुळे जबाबदार पदावर कार्यरत असताना हे कृत्य करणे अशोभनीय असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटवली जात आहे. हि कारवाई ग्रामीण पोलीस संदीप माने, ईश्वर चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी वसंत चव्हाण व निवृत्ती राठोड यांचा समावेश आहे.