भुसावळ प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील टोळी गावातील तरूणीवर बलात्कार करून जीवे ठार मारणाऱ्या आरोपींना पकडून कठोरात कठोर शिक्षा करावी व पिडीत मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
खालीलप्रमाणे मागण्या करीत आहे –
१) सदरहू खटल्या कामी पिडीतेला व पिडीतेच्या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी जळगाव येथील मा.श्री .अॅड.उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करून सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा .
२) सदरच्या खटल्याचा तपास पूर्ण होई पर्यंत सदर पिडीतेच्या परिवाराला पुरेसे संरक्षण अदा करण्यात यावे.
३) सदरच्या गुन्ह्यात संबधित पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्या विरुद्ध कायम स्वरूपी निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.
४) पिडीतेच्या कुटुंबीयास मनोधैर्य योजनेचा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या प्रमाणे संरक्षणाचा लाभ मिळावा.
५) जळगाव जिल्ह्यात भविष्यात अशा स्वरूपाच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस महिला विभाग अधिक कार्यक्षम करावा व योग्य त्या उपाय योजना कराव्यात .
६) सदर गुन्ह्यातील सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना दोष सिद्धी साठी तसेच फाशीची शिक्षा देण्यासाठी सक्षम व कर्तव्य दक्ष महिला तपास अधिकारी यांची नियुक्ती करावी.
यांची होती उपस्थिती
विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, शमिभा पाटिल प्रदेश सदस्य युवक आघाडी व महिला आघाडी, दिनेश इखारे जिल्हा महासचिव, संगीता भामरे जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी, वंदना सोनवणे जिल्हा महासचिव महिला आघाडी, देवदत्त मकासरे, बालाजी पठाडे कामगार नेते, बेबो किन्नर, अश्विनी बाविस्कर, विद्यासागरभाऊ खरात, प्रल्हाद घारु, वनीता इंगळे, शबनम समी, करुणा सुरवाडे, स्वप्नील सोनवणे, हेमंत सोनवणे, जयश्री नन्नवरे, सारिका शिरसाठ, पार्वती गोडाले, तुळसा इंगळे, शिरीन अनवर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.