जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा येथील मुकेश सपकाळे या तरुणाच्या खून प्रकरणी आज कम्युनिस्ट पक्ष व समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मुकेशच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आहे.
या संदर्भात अधिक असे की, एम.जे. कॉलेजमध्ये आसोदा येथील मुकेश मधुकर सपकाळे (वय २१) या तरूणाचा शनिवारी 30 जून रोजी खून करण्यात आला होता. किरकोळ कारणावरून करण्यात आलेल्या या क्रूर हत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. तर शैक्षणिक परिसरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याच संदर्भात कम्युनिस्ट पक्ष व समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढला.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात मुकेश सपकाळे खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालविण्यात यावा, मुकेशच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व त्याचा थेट संपर्क पोलीस कंट्रोल रूममध्ये असावा, एम.जे. महाविद्यालय प्रशासनाची चौकशी करण्यात यावी तसेच महाविद्यालयात त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, महाविद्यालयांमध्ये ओळखपत्र बघितल्या शिवाय कुणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देते वेळी असंख्य नागरिक उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/337703190506039/