पुणे- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यने झालेल्या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून १० कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ढिगार्याखाली अनेक कामगार दाबले गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
शास्त्रीनगर चौक वाडीया बंगला गेट क्रमांक आठ येथे नवीन इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू होते. त्यावेळी स्लॅबची लोखंडी गजाची जाळी अचानक कोसळली. त्यावेळी तेथे काम करणारे कामगार वजनदार लोखंडी जाळीखाली अडकले. अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशनम दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
इमारतीच्या ढिगार्याखाली आणखी कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांना ढिगार्याखालून काढून प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहे. ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तळमजल्यावरील कामगार ढिगार्याखाली अडकले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या दुर्घटनेबाबत ट्विट करून घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, असे ट्विट महापौर मोहोळ यांनी केले. तर प्रशासनाने या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे जाहीर केले आहे. पहाटेपर्यंत या इमारतीमध्ये बचावकार्य सुरू होते.