मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते, मुक्ताईनगर तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य पुंडलिक सरक यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष,उमेदवार रोहिणी खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी रोहिणी खडसे यांनी पुंडलिक सरक यांच्या गळ्यात पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.
पुंडलिक सरक हे धनगर समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असुन राजुरा गावचे माजी सरपंच आहेत. मेंढपाळ बांधवांसाठी त्यांचा सतत संघर्ष असतो मेंढपाळ बांधवांना येणारे प्रश्न सोडविण्या साठी ते सतत प्रयत्नशिल असतात त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निश्चितच फायदा होईल. याप्रसंगी डॉ बि सी महाजन, प्रविण कांडेलकर, शुभम खंडेलवाल, मयुर साठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ,महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते