पाचोरा येथे ”प्रबुद्ध पर्व” पुस्तकाचे प्रकाशन

पाचोरा प्रतिनिधी । आज क्रांतीसुर्य, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने दिपक सोनवणे यांनी संकलित केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग त्यांच्या जीवनावर प्रकाशित झालेले लेख, दुर्मिळ छायाचित्र व महत्वपूर्ण माहिती यावर आधारित संकलित केलेले “प्रबुद्ध पर्व” या पुस्तकाचे प्रकाशन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा गटनेते (राष्ट्रवादी काँग्रेस)  संजय वाघ यांच्या हस्ते एम .एम. महाविद्यालयात संपन्न झाले. 

महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ .वासुदेव वले, संबोधी फाउंडेशनचे अध्यक्ष अजय अहिरे, प्रा .जे .व्ही. पाटील, प्रा .गोपाळ प्रा. इंगळे, प्रा. एस. एम. पाटील, प्रा. तडवी, रमेश गायकवाड, ऋषिकेश ठाकूर, सुनील नवगिरे, रवी कदम, प्रवीण खेडकर, अभिषेक जाधव इत्यादींच्या उपस्थितीत संपन्न झाले. सुरुवातीलाच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. प्रा. वासुदेव वले व अजय अहिरे यांनी त्रिसरण पंचशीलाचे पठण केले व प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  एम. एम. महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेता सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सदरचा कार्यक्रम छोटेखानी स्वरूपात घेण्यात आला.

 

Protected Content