विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य कृतींचे प्रकाशन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विविध मान्यवरांच्या साहित्य कृतींचे प्रकाशन करण्यात आले.

संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे ,वर्धा येथील संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, उद्घाटक रहमान अब्बास धामस्कर ,स्वागताध्यक्षप्र शाम पाटील,प्रतिमा परदेशी, रणजीत शिंदे, प्रा.डॉ. लिलाधार पाटील, प्रा. अशोक पवार, मुकुंद सपकाळे प्रशांत निकम, लीना पवार, यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या साहित्य कृतींचे प्रकाशन करण्यात आले.

यात डॉ. मिलिंद बागुल लिखित तेवढेच संदर्भ आमचे कवितासंग्रह लेखिका प्रणाली मराठे स्वयंप्रकाशित व्हायचंय काव्यसंग्रह बहुजनांचा सांस्कृतिक एल्गार, रा.स्व. संघ जातीव्यवस्था आणि हिंदू राष्ट्र लेखक नागेश चौधरी युद्धघोष प्रेमानंद बनसोडे,द्रोह कवी सतीश निकम ,खानदेशातील आंबेडकरी चळवळ संपादक गौतम निकम, सतीश म्हस्के, प्रतापराव साळुंखे ,डी एस घोडेश्वर, वैशाली निकम, समाजभूषण सावित्रीबाई फुले यांच्यावरील पुस्तकाचा अनुवाद शांताबाई रघुनाथ बनकर राकेश खैरनार लिखित कथासंग्रह बोन्साय सुनील गायकवाड लिखित भिलाटी कथासंग्रह नारायणराव जाधव येळगावकर लिखित गातच राहू या काव्यसंग्रह भागवतराव सोनवणे लिखित आमचा बाप, किसन वराडे लिखित सारवा हे आत्मकथन अशा सामाजिक आशयाच्या कथा ,कविता, कादंबरी संग्रहाचे प्रकाशन विद्रोही साहित्य संमेलनात करण्यात आले.

Protected Content