मुक्ताईनगर – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोळी समाज वधू वर परिचय पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला. याप्रसंगी वधू-वर परीचय पुस्तिकेचे प्रकाशन आ.चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
कोळी युवक मंच मुक्ताईनगर यांच्याद्वारे आयोजित कोळी समाज वधु वर परिचय पुस्तिकेचा दुसरा प्रकाशन सोहळा दि.13 मार्च रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला. या प्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोळी युवक मंचचा हा समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.
माजी जि.प.अध्यक्ष व कोळी समाजाचे नेते अशोक कांडेलकर, ओ.बी.सी.सेल काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, जि.प.सदस्य निलेश पाटील, वैशाली तायडे यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश तायडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.संतोष कोळी यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वधू व वरांसाठी उचित व योग्य स्थळ शोधणे जिकरीचे असल्याने मागील वर्षापासून हा समाजोपयोगी उपक्रम समाजहितासाठी पंकज कोळी यांच्या कोळी युवक मंचने सुरु केला असल्याचे अँड.संतोष कोळी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला डॉ दिवाकर पाटील, डॉ दिलीप तायडे, रवींद्र कांडेलकर, गोपाळ सोनवणे, मुरलीधर पाटील, संजय कांडेलकर, सुकलाल सांगळकर, गणेश कोळी, नगरसेवक संतोष कोळी, निलेश शिरसाठ, राजेंद्र कांडेलकर, छोटु भोई, सुनिल पाटील, शिवाजी पाटील, अँड.राहुल पाटील, महेंद्र मोंढाळे, सूर्यकांत पाटील, आरिफ आझाद, निलेश भालेराव, संजय बावस्कर, सरपंच संतोष कोळी, प्रमोद कोळी, श्रीकृष्ण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर खवले, सपकाळे अप्पा, राजेंद्र जाधव, अक्षय ठाकरे, लखन बावस्कर, शुभम तायडे, मंगेश कोळी, अर्जुन कोळी, स्वप्नील खिरोळकर, शुभम कोळी, रोहन पाटील, विष्णू कोळी, प्रतिक तायडे, किरण कोळी, गजानन कोळी, भुषण कोळी, गौरव कोळी यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर हे होते. हा उपक्रम खंडीत न होता दरवर्षी करण्यात यावा अशी सूचना अशोक कांडेलकर यांनी युवक मंचला केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कोळी युवक मंच व मंचचे अध्यक्ष पंकज कोळी व कोळी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.