भुसावळ येथे ‘समर्पण’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन

samerpan granth

भुसावळ, प्रतिनिधी | परिपूर्ण ज्ञानासाठी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालावी लागते. आपल्याजवळील शिक्षणाला किंबहुना ज्ञानाला तेजोमयी करायचे असेल तर त्याला अध्यात्मिकतेचा स्पर्श देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन धरणगाव येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा कीर्तनकार प्रा.सी.एस. पाटील यांनी आज (दि.१) येथे केले. येथील भुसावळ हायस्कूलमध्ये ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे आयोजित समर्पण या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मिनाक्षी वायकोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डाक अधीक्षक पुरूषोत्तम सेलूकर, फैजपूर मुख्याधिकारी किशोर चव्हाण, डॉ.जे.बी. राजपूत हे उपस्थित होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.आर. पाटील यांच्या सेवाकाळ व सेवानिवृत्तीनंतरच्या काळातील कार्याचा आढावा घेणारा ‘समर्पण’ हा गौरव ग्रंथ मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. प्रास्ताविकात गृपप्रमुख डॉ.जगदीश पाटील कार्यक्रम आयोजनाचा हेतू सांगून समर्पण गौरव ग्रंथाची पार्श्‍वभूमी सांगितली. लीलाबाई यांनी गीतेचा पंधरावा अध्याय म्हटला. मान्यवरांचा परिचय अमितकुमार पाटील, समर्पण परिचय सौ. हेमांगिनी चौधरी, विशेष सत्कारार्थी परिचय संजय ताडेकर तर मानपत्राचे वाचन सौ. मनिषा ताडेकर यांनी केले. त्यानंतर बी.आर. पाटील व सौ.लिलाबाई पाटील यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मोत्याची माळ व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. श्रीकांत जोशी, जीवन महाजन, डी.के. पाटील, प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, डॉ. सत्यजित पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सौरभ पाटील, संजीव बोठे, डॉ.पूजा राठी, शैलेंद्र महाजन, प्रमोद आठवले, डॉ. शुभांगी राठी, डॉ.जगदीश पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. पुरूषोत्तम सेलूकर, किशोर चव्हाण, डॉ.जे.बी. राजपूत यांनी कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय मनोगतात डॉ.मिनाक्षी वायकोळे यांनी सोशल मिडीयाचा सदुपयोग करणार्‍या ज्ञानासह मनोरंजन गृपच्या विविधांगी उपक्रमांचे कौतुक केले. हभप लक्ष्मण महाराज यांनी पसायदान म्हटले. सूत्रसंचालन प्रा.डी.एम. ललवाणी यांनी केले तर आभार प्रा. उमाकांत पाटील यांनी मानले.

Protected Content