चोपडा येथे ग्रामीण पत्रकारसंघातर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन

 

लासुर ता.चोपडा, प्रतिनिधी | येथील श्री नाटेश्र्वर ग्रामिण पत्रकार संघ यांच्याकडून सालाबादप्रमाणे यंदाही सन २०२० दिनदर्शिकेचे प्रकाशन ह.भ.प.दिलीप महाराज रवंजेकर ( भागवताचार्य) यांच्या हस्ते करण्यात आले.

लासुर येथे श्रीराम मंदिर जिर्णोद्धाराचे कार्य सुरू केले असून या निमित्ताने भागवत सप्ताह सुरू आहे. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. लासुरच्या लोकनियुक्त सरपंच जना माळी, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप पालीवाल, सचिव विनोद भाऊसाहेब, उपाध्यक्ष देविलाल बाविस्कर, सल्लागार श्रीराम पालीवाल, कैलास बाविस्कर, आत्माराम पाटील, प्रल्हाद पाटील, राजेंद्र बिडकर, महेंद्र माळी, बापु चौधरी, गुणवंत महाजन, चेतन महाजन, परेश पालीवाल, विश्राम तेले, इकबाल मन्यार तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ व भाविक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर दिनदर्शिकेचे लासुर तसेच पंचक्रोशीत विनामूल्य वाटप करण्यात येणार असून दिनदर्शिकेत वर्षभरात गावात होणारे सामाजिक कार्यक्रम,कीर्तन सप्ताह यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Protected Content