पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघाचा वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना जाहीर पाठींबा देण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.दिलीप पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, जिल्हा सदस्य अमोल पाटील, शेखर पाटील यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांची भेट घेवुन जाहीर पाठींबा बाबतचे पत्रक सुपुर्द केले. प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे एरंडोल विधानसभा अध्यक्ष कुणालभाऊ महाजन उपस्थित होते.