जळगाव प्रतिनिधी । जळगाव आगाराच्या आवारात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद संपाला जळगावातील अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने शुक्रवारी जाहीर पाठींबा दिला आहे. याबाबत सकाळी पाठींब्याचे पत्र दिले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, बस ही सर्वसामान्याची जीवन वाहिनी ओळखली जाणारी लालपरी आहे. गेल्या सहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या महामंडळाने शासनात विलीनकरण करावे, वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. यापुर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. परंतू अद्यापपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाही. गेल्या महिन्यात देखील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. परंतू त्यावेळी शासनाचे लवकर मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन दिले होते. परंतू तसे झाले नाही, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंदचा संप पुकारला आहे. यात आतापर्यंत ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद संपामुळे वाहतूकीची मोठी गैरसोय होत आहे.
दिवाळी नंतर आता शाळा व महाविद्यालये सुरू झालेले आहे. विद्यार्थी बस पास काढून प्रवास करतात, आता बस बंद असल्यामुळे खेडगावातील विद्यार्थ्यांना शाळेत व महाविद्यालयात येण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. शासनाने तातडीने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढून बस सेवा सुरळीत करण्यात यावी अशी मागणी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे. याप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगरमंत्री रितेश महाजन, महानगर सहमंत्री पूर्णीमा देशमुख, नगरमंत्री मयूर माळी, मनीष चव्हाण, दुर्गेश वर्मा, अक्षय वाणी, नितेश चौधरी, ऋत्विक माहुरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.