जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात शहरातील मायदेवी नगरातील रोटरी भवन येथे ‘महोत्सव समिती’च्या वतीने एक व्यापक बैठक संपन्न झाली.
दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्या संदर्भात एक व्यापक बैठक ‘महोत्सव समिती’च्या वतीने शहरातील रोटरी भवन मायदेवी नगर येथे आयोजित करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती गेल्या २० वर्षांपासून जळगाव शहरात भव्य शिवजयंती चे आयोजन करत असते . सर्व धर्म, जाती, पंथ यांना सोबत घेत दरवर्षी ७ दिवसाचा ‘शिवमहोत्सव’ साजरा करण्यात येतो. यात व्याख्यान, पोवाडे, कीर्तन, नाटक अशा विविध माध्यमातून शिव विचार पोहचवण्याच काम समिती करते.
या वर्षी करोनाचा प्रसार कमी झाला आहे. हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. सरकार निर्बंध कमी करत आहे. यावर्षी शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात सरकार आदेश देईल त्याप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय बैठकीत झाला. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, सेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे एजाज गफार मलिक, पुरुषोत्तम चौधरी, नगरसेवक अनंत जोशी, मुकुंद सपकाळे, उद्योजक किरण बच्छाव, करीम सर सालार, सुरेंद्र पाटील, विनोद देशमुख, पाटील, फहीम पटेल, हिरालाल चव्हाण, समीर जाधव, विकास मराठे, अविनाश पाटील व अनेक लोक उपस्थित होते. सार्वजनिक शिवजयंती ही सगळ्यांची आहे यात सगळ्यांनी सामील व्हावे असे आवाहन शिवजयंती समितीचे निमंत्रक शंभू पाटील यांनी केले आहे .