मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीच्या हत्येचा निषेध करत तिला तात्काळ न्याय मिळावा या मागणीसाठी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करुन निर्घृण हत्या केल्याबद्दल जाहीर निषेधाचे निवेदन मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्या मार्फत मुक्ताईनगर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गोंडगाव येथे पुरोगामी महाराष्टाृला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे, त्याने केलेल्या पाशवी , अमानवीय कृत्य केल्याबद्धल अशा नराधमास भर चौकात फासावर चढवावे. जेणेकरुन असे अमानवीय कृत्य करण्याची हिम्मत कुणाची होणार नाही. व त्या निरागस , निरपराध बालिकेस न्याय मिळावा. अशी मागणी सकल मराठा समाज मुक्ताईनगर च्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्याचे मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख, तालुका सचिव यु. डी. पाटील, सहसचिव संदिप बागुल, तालुका संचालक मराठा समाज सुधीर तराळ, दिनेश कदम, दिलीप पाटील, साहेबराव पाटील, ललित बाविस्कर, अतुल पाटील चांगलेव, पंकजभाऊ कोळी,गजानन श्रीराम पाटील, शिवाजी मुरलीधर पाटील, वासुदेव तुकाराम महाराज, रवींद्र दगडू पाटील, शशिकांत कातकडे, सुभाष बनिय, चंद्रकांत मराठे, सोपान मराठे, बाबूलाल बोराडे आदी उपस्थित होते.