Home Cities अमळनेर दहिवद येथे जनहित परिवर्तन पॅनल विजयी

दहिवद येथे जनहित परिवर्तन पॅनल विजयी


 

c60312cf bb64 490e a6a6 afa6d55558d6

 

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे दहिवद येथे ‘आपले गांव आपले पॅनल’ची १० वर्षापासून सत्ता होती. यावेळी ‘जनहित परिवर्तन पॅनल’ने यावेळी आपले गांव आपले पॅनलचा धुवा उडवत लोकनियुक्त सरपंच पदासह बहुमताने सत्ता मिळवली आहे.

दहिवद गावांत पाच वार्डांमध्ये १३ जागांसाठी २६ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. तसेच लोकनियुक्त सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. संपुर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले असतांना सत्ताधारी पक्षाने एकही जागा येवू देणार नाही. “आम्ही दगड उभे करू, ते सुद्धा निवडून येतील” असे आव्हान जनहित परिवर्तन पॅनलने दिलेले होते. निवडणुकीत जनहित परिवर्तन पॅनलच्या आठ जागा तर आपले गांव आपले पॅनलच्या पाच जागा निवडून आल्या आहेत.

जनहित परिवर्तन पॅनलचे लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव पाटील या ५५२ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत देवानंद कपूरचंद बहारे ,पाटील सुनिल शालिग्राम ,बाळू आत्माराम पाटील ,पाटील वर्षा गुलाब, पाटील रेखाबाई राजेंद्र, शिवाजी सुकलाल पारधी, माळी वैशाली प्रकाश व गोसावी योगिता भरतगीर हे सदस्य विजयी झाले आहेत. ‘आपले गांव आपले पॅनल’च्या हिराबाई अशोक धुडकर, आशाबाई मोतीलाल माळी, रविंद्र प्रताप माळी, पाटील माणिकराव हिंमत व माळी मालुबाई सुरेश हे सदस्य विजयी झाले आहेत. यावेळी दहिवद गावच्या एकूण मतदान ३९५० मधून ३१५२ एवढे मतदान झाले होते. लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव पाटील यांना १८४४ मते मिळाली तर त्यांनी ५५२ मतांनी छाया प्रविण माळी यांचा पराभव केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound