जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी व मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यात १५९३ वाहनांची सोय करण्यात आली होती.
सोया करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ३९२ एस टी बसेस, मिनी बस १२, जीप २३, टेम्पो १४ सीटर ८, टेम्पो २० सीटर ११, क्रुझर ४७५, स्कूल बस ७०, एस ओ जीप ४१६, ईव्हीएम वाहतूक वाहन ६६,आचार संहिता उल्लंघन कक्ष वाहने ६६,राखीव वाहने ६६ असे एकूण १५९३ वाहनांची सोय करण्यात आली होती.
जिल्हयात मतदान केंद्रावर मतदान साहित्याच्या वाहतूकीसाठी १५९३ वाहनांची सोय
7 months ago
No Comments