पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीतर्फे निषेध आंदोलन
पाचोरा, प्रतिनीधी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील रेल्वे प्रवासी कृती समितीतर्फे आज पाचोरा रेल्वे स्टेशन बाहेर पंजाब मेल, विदर्भ एक्सप्रेस या गाडीच्या थांब्यासाठी तसेच महाराष्ट एक्सप्रेस व भुसावळ देवळाली शटल या गाडीची वेळ पुरवत करण्यासोबत विविध मागण्यांसाठी ६ आॅक्टोबर रोजी रेल्वे प्रशासनाचा पुतळा जाळुन निषेध व्यक्त केला.
पाचोरा, भडगाव तालुक्यासह पंचक्रोशितील प्रवाशांना पाचोरा रेल्वे स्थानकावरून प्रवास करावा लागतो. मात्र या रेल्वे स्थानकावर अनेक सुविधा मिळत नसल्याने प्रवासांची गैरसोय व हाल होतात. प्रवासाशांच्या हक्कासाठी पाचोरा रेल्वे प्रवाशी समीतीतर्फे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात आले. मागच्या दोन वर्षापासून धरणे आंदोलन असेल, निषेध आंदोलन, डी. आर. एम. यांची भेट, त्यांना सह्यांचे निवेदन आधी विविध आंदोलन करण्यात आले .परंतु रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. यासाठी ६ आॅक्टोबर रोजी पाचोरा रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा पुतळा जाळून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
पाचोरा स्टेशनवर पंजाब मेल, विदर्भ एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा अशी जुनी मागणी होती. कारण संध्याकाळी सहा वाजेनंतर पाचोरा रेल्वे स्टेशन वरून मुंबईकडे जाणारी कोणतीच गाडी नाही त्यामुळे पाचोरासह भडगाव जामनेर एरंडोल सोयगाव आधी तालुक्यांच्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच नियमित नोकरी व इतर काम धंद्यासाठी जळगावला जाणारे अपडाऊन करणारे यांच्यासाठी भुसावळ देवळाली शटल व महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीची वेळ पूर्ववत करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.
या आंदोलनामध्ये रेल्वे प्रवासी कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, खजिनदार पप्पू राजपूत, सरचिटणीस सुनील शिंदे, उपाध्यक्ष भरत खंडेलवाल, नंदकुमार सोनार, प्रा. मनीष बाविस्कर, हरिभाऊ पाटील, संजय जडे, अॅड.अण्णा भोईटे, विकास वाघ, माजी नगरसेवक अविनाश साळवे, अशोक मोरे, शहबाज बागवान, एकता ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ चंदनशिव, निलेश पारोचे, राजीव पाटील, आकाश शिंदे आधी कार्यकर्ते व कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वे प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला.