रॅगींगमुळे आत्महत्या केलेल्या तरूणीचा मृतदेह घेऊन नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात ( व्हिडीओ )

jalgaon protest with dead body

जळगाव प्रतिनिधी । रॅगींगमुळे आत्महत्या केलेल्या आदिवासी विद्यार्थीनीची मृतदेह घेऊन आज सकाळी तिच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपला रोष व्यक्त केला. २४ तासांमध्ये दोषींवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या आदीवासी तरूणीची सिनिअरकडुन करण्यात येणार्‍या रॅगींगच्या छळाला कंटाळुन बुधवारी रात्री मुंबई येथे हॉस्टलच्या खोलीत गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असुन या संदर्भात आग्रीपाडा भायखळा, मुंबई येथे तिघा सिनिअर डॉक्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डॉ. पायल सलमा तडवी यांच्या आईने आधीच रॅगींगबाबत तक्रार केली असली तरी यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. तिच्या सिनिअर असणार्‍या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महीरे, व डॉ. अंकीता खंडेलवाल ह्या पायलच्या प्रवेश घेतल्यापासून तीला मानसिक त्रास देत होत्या. यात हॉस्पिटमध्ये रुग्णांसमोर तिचा अपमान करणे, तिच्या वैद्यकीय अभ्यासात अडचणी निर्माण करणे, .वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देणे यांचा समवेश होता. तसेच सोशल मीडियातही तिच्याबाबत आक्षेपार्ह कॉमेंट करण्यात येत होत्या. मात्र प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे पायलने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

दरम्यान, यामुळे संतप्त झालेल्या तिच्या आप्तांनी आज सकाळी थेट तिचा मृतदेह घेऊन जिल्हाधीकारी कार्यालय गाठले. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. येथे जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण काही काळ तणावग्रस्त बनले होते. २४ तासांमध्ये दोषींवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

पहा : संतप्त आदिवासी बांधवांची मागणी.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/187327442166314/

Add Comment

Protected Content