Home Cities एरंडोल एरंडोल तहसीलसमोर रिपाइंचे लाक्षणीक उपोषण ( व्हिडीओ )

एरंडोल तहसीलसमोर रिपाइंचे लाक्षणीक उपोषण ( व्हिडीओ )


एरंडोल । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी रेशनकार्ड धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी एकदिवशीय उपोषण करण्यात आले. या उपोषणात शासन नियमानुसार नवीन तसेच ट्रान्स्फर व विभक्त रेशनकार्ड सात दिवसांच्या आत मिळावे, शहरी भागासाठी शिधापत्रिकेसाठी नगरपालिका मुख्याधिकारी यांचा रहिवाशी दाखला शिथील करावा, एरंडोल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले.

यांनी घेतला सहभाग
एरंडोल तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणात जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, भडगाव तालुकाध्यक्ष खेडकर, प्रदीप बाविस्कर, गजानन पाटील, सिताराम मराठे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

पहा : उपोषणात सहभागी उपोषणकर्त्यांची प्रतिक्रीया


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound