मुस्लीम समाजाचे मातोश्रीच्या बाहेर आंदोलन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मुस्लिम समाज एकत्र झाला आहे. मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. मातोश्री बाहेर मोठ्या संख्येने मुस्लिम समाज एकत्र जमा होऊन उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत आहे. ठाकरे गटाचे नऊ खासदार लोकसभेत पाठवले. वक्त बोर्ड संदर्भात विरोध न करता बाहेर निघाले. त्यामुळे ठाकरे गटाच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे.

दरम्यान मातोश्री परिसरात मुस्लिम समाजासमोर ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठा संख्यामध्ये जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मातोश्री बाहेर मोठा तणावाचा वातावरण निर्माण झाला आहे. डीसीपी गेडाम दीक्षित सोबत मोठ्या संख्यामध्ये पोलिसांचा फौजफाटा घेऊन मातोश्री बाहेर दाखल झाला आहेत. उद्धव ठाकरे मातोश्रीमधून ठाण्याच्या सभेसाठी बाहेर निघणार आहेत. त्यापूर्वीच मुस्लिम समाज मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करताना दिसत आहे.

मुस्लिम समाजाकडून त्यांच्या विरोध केला जाणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून मातोश्री बाहेर रस्ता जाम केला जात आहे. मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांना मोठा संख्येमध्ये मत दिले आहे. मात्र, ते वक्त बोर्ड संदर्भात का बोलत नाही, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मुस्लीम समाज आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा संख्येने पोलिस तैनात होत आहेत.

मातोश्री बाहेर पोलिसांनी मुस्लिम समाजाचे एक एक लोकांना ओळख पटवून गाडीमध्ये ताब्यात घेत आहेत. मातोश्रीमधून उद्धव ठाकरे ठाण्याच्या सभेसाठी बाहेर निघताना मुस्लिम समाजाकडून उद्धव ठाकरे यांच्या ताफा थांबवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, त्यामुळे पोलिसांनी मातोश्रीचा आजूबाजूला असलेला सर्व गाड्यांचा तपासणी करत आहेत. मातोश्रीचे शेजारी असलेला गार्डनमधून मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Protected Content