जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकी अजित पवार गटाला मिळाल्यानंतर या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयासमोर बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता निषेध व्यक्त करण्यात आला. “आले रे आले….गद्दार आले “अशा वेगवेगळ्या घोषणाबाजी करून निषेध करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार यांच्या मालकीचा असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयासमोरील प्रांगणात बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार गट समोर आल्याने शरद पवार गटाकडून “आले रे आले… गद्दार आले” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान यावेळी पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, रिकू पाटील, अनिल पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.