Home धर्म-समाज आ.आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेचा निषेध

आ.आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेचा निषेध

0
31


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका पुलाच्या उद्घाटनासाठी आले असता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला सन्मानपुर्वक व कुठलाही विनयभंग करण्याचा हेतू मनात न ठेवता महिलेला पुढे जाता यावे यासाठी मागे सरकावले, यावरून महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, मुक्ताईनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिलेचा निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटा गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर

यावेळी असिफ बागवान, रउफ खान, चेतन राजपूत, संजय कोळी, भय्या पाटील, जुबेर अली, भावेश रायपूर, संदीप जमले, अनिस पटेल, रफिक शहा, दीपक ससाणे, बापूभाऊ ससाणे,
मोसिन खान, सुमित तळेले, ,रफिक मिस्तरी ,नीलेश भालेराव, भूषण वानखेडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound