हॉटेल व्यावसायिकाचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबविले

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिंगाईत येथे बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोमवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रवीण दिलीप पाटील (वय-३७) रा. शिंगाईत ता. जामनेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हॉटेलचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते १४ नोव्हेंबर सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून बाहेर गावी केले होतते. अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत, बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने, मंगलपोत, कानातील दागिने असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवीण पाटील यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते करीत आहे.

 

Protected Content