चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात हुकुमशाही पद्धतीने रेडीओ फ्रिक्वेंसी मिटर बसवण्यात येत आहे. या मिटरमुळे सर्वसामान्य जनतेला तिप्पट विज बिल येत आहे. हे बिल सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखे नाहीय. त्यामुळे सदर मिटर बसविण्याचे काम तत्काळ बंद करावे, यामागणीसाठी रयत सेना व युनिटी क्लबच्या वतीने चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
विज वितरण कंपनीच्या वतीने चाळीसगाव शहरात हुकुमशाही पद्धतीने रेडीओ फ्रिक्वेंसी विज मिटर बसवण्यात येत आहे. या मिटरमुळे सर्वसामान्य जनतेला तिप्पट विज बिल येत आहे. हे बिल परवडण्यासारखे नाही. त्यामुळे सदर मिटर बसवणे बंद करावे. यासाठी रयत सेना व युनिटी क्लबच्या वतीने चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर मंगळवारपासुन बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जोपर्यंत रेडीओ फ्रिक्वेंसी विज मिटर बसविणे बंद होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.
यावेळी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, युनीटी क्लबचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष निकुंभ ,जिल्हा अध्यक्ष संजय कापसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाअध्यक्ष आकाश धुमाळ,जिल्हा उपाध्याक्ष सप्निल गायकवाड, जिल्हा उपाध्याक्ष सूर्यकांत कदम ज्ञानेश्वर कोल्हे, व्यापारी सेनेचे तालुका अध्यक्ष विकास बागड ,शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,शहर अध्यक्ष सचिन नागमोती ,शहर अध्यक्ष योगेश पाटील ,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे , मुकुंद पवार, समाधान मांडोळे ,शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे ,विभाग प्रमुख गोपाल देशमुख, विद्यार्थी सेनेचे गौरव पाटील अनिकेत शिंदे ,गणेश निकुंभ, सुधीर शिंदे ,संतोष निकुंभ, भाऊसाहेब सोमवंशी ,जयदीप पवार,सागर पाटील,अभिमन्यू महाजन ,अजिज खाटीक,योगेश पांडे ,प्रदीप पाटील,सागर नागणे , दीपक देशमुख,शुभम पाटील, जी.जी वाघ. तसेच युनिटी क्लबचे सप्निल कोतकर, मनीष मेहता, हेमंत वाणी ,भुपेश शर्मा, निशांत पाठक ,सतिश जैन प्रगत संस्थेचे खुशाल मराठे यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी सहभागी झाले आहेत.
जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील,बाजार समिती सभापती रवींद्र पाटील,उपसभापती महेंद्र पाटील,नगरसेवक सुरेश स्वार, राजेंद्र चौधरी,रामचंद्र जाधव,भगवान राजपुत,दिपक पाटील,सूर्यकांत ठाकुर,शेखर देशमुख, जगदीश चौधरीव जन आंदोलन चे गौतम निकम ,चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे व शेकाप चे गोकुळ पाटील यांनी पाठींब्याचे पत्र दिले आहे. राजकीय सामाजिक व्यापारी वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवरानी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.