वरणगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा वरणगाव शिवसैनिकांनी जाळून निषेध व्यक्त केला.
जन आशीर्वाद यात्रेमध्ये नारायणराव राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वक्तव्य केल्यामुळे आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळ्याचे दहन करून बस स्टँड चौकामध्ये निषेध व्यक्त केला यावेळी वरणगाव शहरातील शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते नारायण राणे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी याठिकाणी करण्यात आली