जळगाव मुस्लिम बांधवांतर्फे त्रिपुरा येथील हल्ल्याचा निषेध; जिल्हा प्रशासनाला निवेदन

जळगाव प्रतिनिधी । त्रिपुरा येथे अल्पसंख्याक व धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ  मानियार बिरादरी व मुस्लिम बांधवांच्या वतीने आज शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अप्पर जिल्हाधिकारी महाजन यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील त्रिपुरा येथे अल्पसंख्यांक व धार्मिक स्थळावर हल्ले झाले आहे. आणि आजही सुरू आहेत. या हल्ल्याचा मुस्लिम बांधवांतर्फे तीव्र निषेध केला जात आहे. सतत होणारे हल्ले भारत सरकारने तातडीने थांबवावे आणि हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जळगाव शहरातील विविध राजकीय, सामाजिक व  शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे मुस्लिम समाजातिल महिला व पुरुषांनी एकत्रित येवून केली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनावर मानियार बिरादरीचे फारुक शेख, राष्ट्रवादीचे फिरोज शेख, शिकलगार बिरादरीचे अन्वर शिकलगर, अझीझ सिकलगर, फुले मार्केट असोसिएशनचे फारूक अहेलेकार, सत्यप्रचारचे वसीम खान, जामा मसजीद ट्रस्टचे सय्यद चांद, जमात ए इस्लामीचे मुस्ताक मिर्झा, समाजवादी पार्टीचे शेख मोहिनुद्दीन इक्बाल व अझीझ खान, एमआयएमचे महानगराध्यक्ष दानिश सय्यद, उर्दू पत्रकार शेख कामिल, कैफ खान, जळगाव जिल्हा मुस्लीम सेवा संघाच्या अध्यक्ष फिरोजा शेख, महासचिव ॲड. नसरून फातेमा पिरजादे, संचालिका राणी शेख ,  रहेमत उस्मान पटेल, मुस्तफाखान, महबूब शेख,  दिव्यांग संघटनेचे मुजाहिद खान, शिवाजीनगर मित्र मंडळाचे तोफिक पटेल आदींची उपस्थिती होती.

 

Protected Content