Home राजकीय रक्षाताई खडसे यांचा एबी फॉर्म जमा

रक्षाताई खडसे यांचा एबी फॉर्म जमा


जळगाव (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार रक्षाताई खडसे यांचा एबी फॉर्म आज त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने जमा केला आहे. दरम्यान, एबी फॉर्म जमा नसल्याच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा सुरु होत्या. परंतु त्यावर आज अखेर पडता पडला आहे.

 

भाजप केंद्रीय समितीने देशभरातील जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत रोवर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांची उमेदवारी घोषित केली होती. पक्षाच्या प्रक्रियेनुसार उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेला पक्षाचा एबी फॉर्म नंतर जमा केला जाणार होता. परंतु या मुद्द्यावरून चर्चेला उधान आले होते. परंतु श्रीमती खडसे यांचे निवडणूक प्रतिनिधी योगेश कोलते यांनी आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे सपूर्द केला. दरम्यान, जळगाव लोकसभेसाठी स्मिताताई वाघ यांचा देखील एबी फॉर्म जमा झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound