जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राची एक उज्वल परंपरा असताना सुद्धा महाराष्ट्रातील घटनांमुळे मनविचलित झाले. अशा घटना शासनाने त्वरित थांबवावे यासह विविध मागण्यासांठी जळगाव शहरातील मुस्लिम शिष्टमंडळाने गुरूवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मागण्यांचे निवेदन महसुल विभागाचे उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उरण येथील एका तरूणीसोबत दाऊद शेख याने तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण पणे खून केला तसेच पुणे येथील मावळ येथील राहणाऱ्या एका तरूणीसोबत गजेंद्र दगडखेर व रवि गायकवाड यांनी गैरकृत्य करून तिच्या दोन लहान बालकांना जिवंत पाण्यात बुडून मारून टाकल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना अतिशय भयंकर असून दोघी घटनेतील संशयित आरोपींना जलद न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, दोन्ही प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, तसेच जे राजकीय व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे समाजाचे ठेकेदार या घटनांना धार्मिक रंग देत आहे व दोन समाजात तेढ निर्माण करीत आहे, अशा राजकीय व धार्मिक नेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मागणीचे निवेदन देतांना कुल जमातीचे अध्यक्ष सैयद चांद, मन्यार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अहमद सर, इमदाद फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल, ए यू शिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, एंजल फूडचे अध्यक्ष दा शेख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महानगर अध्यक्ष फिरोज शेख, राजनेता शेख आशिक, शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान, आदींची उपस्थिती होती.