जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथील वृध्द महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २८ मार्च रोजी दुपारी दीड वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनीवारी २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनुसयाबाई उत्तम ठाकरे वय ६५ रा. कानळदा ता. जळगाव या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ४ मार्च ते २८ मार्च च्या कालावधीत त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने, सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी २८ मार्च रोजी दुपारी २ वाजता वृध्द महिला घरी आल्या तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीवारी २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.