फैजपूर प्रतिनिधी । शहराला पाणीपुरवठा करून शहरवासियांची तहान भागविणारे सुकी (गारबर्डी) धरण पूर्णपणे भरल्याने फैजपुर शहराच्या वतीने नगराध्यक्षा महानंदा होले व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते धरणावर विधिवत जलपूजन करण्यात आले.
फैजपूर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष महानंदा होले यांनी विधिवत पूजा करून साडी-चोळी व नारळ वाढवून जलपूजन केले. यावेळी उपनगराध्यक्ष रशिद तडवी, ज्येष्ठ नगरसेवक तथा जिल्हा दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा अमिता चौधरी, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, काँग्रेस गटनेते कलीम खा मन्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, केतन किरंगे, नगरसेविका शकुंतला भारंबे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, माजी नगरसेविका निलीमा किरंगे, रवीन्द्र होले यांची उपस्थिती होती.