वरणगाव , प्रतिनिधी | येथील प्रा. डॉ. प्रदिप सुरवाडकर यांना नुकतेच सोलापूर येथे राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अपूर्वा अभिमीत ज्ञानपीठ, लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार व राज्यस्तरीय गुणवत अभियंता पुरस्कार सोलापूर येथे प्रदान करण्यात आला. त्यात वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रदिप सुरवाडकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या अगोदर त्यांना २०१७ मध्ये देखील शिक्षकरत्न पुरस्काराने अहमदनगर येथील गौरविण्यात आले होते. तसेच ते या अगोदर विविध पुरस्कारांनी सन्मानित आहे. कार्यक्रमासाठी उद्घाटक डॉ. गोविंद नांदेडे ( शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य, पुणे ) तसेच अध्यक्ष गंगाधर म्हमाणे ( शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे) प्रमुख उपस्थिती अशोक भांजे ( प्रेसिडेंट, लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो आदी उपस्थित होते.